निगडी (प्रतिनिधी) निगडी येथील फेस डेंटल इंटरनॅशनल क्लिनिक ,विपास फौंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी पिंपरीच्या वतीने ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपनिरीक्षक दिनकर गावडे, हृदयरोग तज्ज्ञ डॉ महेश खराडे,रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी पिंपरीचे अध्यक्ष प्रशांत शेजवळ, मेडिकल संचालक डॉ. प्रकाश पाटील डॉ. दिगंबर इंगोले, डॉ. अभय कसळे,डॉ. विष्णू नांदेडकर , सेक्रेटरी वैभव गवळी ,गुरूदास भोंडवे, धनंजय कदम, अनिल खेडकर , प्रमोद जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. प्रकाश पाटील म्हणाले कि, शरीराचे ४ स्तंभ जसे दात, डोळे, हृदय व हाडे ह्यांच्या व्याधी सुरु झाल्या कि म्हातारपण येते. तसेच खाद्य पदार्थातूनच विकार होतात, आणि सकस आहार घेतल्याने आपण निरोगी बनू शकतो.
नेत्रतज्ज्ञ डॉ.गोविंद सिंग म्हणाले कि,आजकाल लहान मुलांना नेत्र विकार आढळून येतो.
स्क्रिनींग टायमिंग वाढल्याने डोळ्यांच्या व्याधीमध्ये प्रचंड वाढ झाली . वयाच्या 50/55 नंतर कमी दिसणे हे नैसर्गिक असते . दृष्टीदोष टाळण्यासाठी
आहाराकडे अधिक लक्ष द्यायची आवश्यकता आहे. दिवसातून 3 वेळा कोमट पाण्याने स्वच्छ करावे. मोबाईलचा वापर कमी करावा. ग्लोबोकोमा तर खूपच हानिकारक ठरतोय. आहार, विहार , तणावमुक्त जीवन जगा.
डॉ. अभय म्हणाले कि, डायबिटीज, व्याधी, सांधे, बीपी, मनक्याचे आजार, जीवन शैलीमुळे होत आहे. परंपारिक जीवन शैलीत निरोगी जगत होतो. नको ते आहार घेतल्याने भूक मंदावणे म्हणजे आजाराला आमंत्रण असते.
डॉ. महेश खराडे हृदय विकारावर बोलताना म्हणाले कि, डॉक्टर च्या साल्या शिवाय कुठलेही औषधी बंद करू नये व घेऊ नये.
उपनिरीक्षक गावडे यांनी जेष्ठ नागरिकांकरिता पोलीस प्रशांत मार्फत उपलब्ध सहाय्यक विषयी माहिती दिली .
डॉ.गौरी पाटील यांनी आभार मानले.